मुंबई : दिवाळी दसरा जवळ आला की लोक सोने चांदीचे दागिने करतात. दरम्यान आता सणासुदीच्या काळात (festive season) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आज सोने चांदीच्या (gold silver) दरात मोठी घसरण झाली आहे. जोपर्यंत जागतिक मंदी, महागाई, रुपयाची घसरण यांसारखी आव्हाने कायम राहतील, तोपर्यंत सोन्यामधील कमजोरी कायम राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे. आजच दागिने खरेदी (Buy jewelry) करताय मग जाणून घ्या आजचा सोने चांदीचा दर (rates)
आज दिल्लीच्या सराफा बाजारात सोने 139 रुपयांनी स्वस्त झाले असून त्याची किंमत 50326 रुपये प्रति दहा ग्रॅम म्हणजे एक तोळा अशी झाली. MCX वर सोन्याचा करार शुक्रवारी 49,399 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला आणि 6 महिन्यांच्या नीचांकी 49,250 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. MCX वर सोन्याला 48,800 वर पहिला सपोर्ट आहे तर दुसरा मोठा सपोर्ट 47,700 रुपयांवर आहे. MCX वर देशांतर्गत बाजारात सोने सध्या 49446 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे म्हणजेच 554 रुपयांनी सोने घसरले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चांदी आज 363 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
Herbs For Joint Pain: गुडघेदुखीने त्रस्त आहात? अवश्य वापरा या औषधी वनस्पती, मिळेल आराम
दिल्लीत आज चांदीचा भाव 363 रुपयांनी घसरून 58366 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गुरुवारी तो 58729 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता. तसेच सध्या चांदी 1747 रुपयांनी घसरत असून 56280 रुपये प्रति किलो पातळीवर आहे.
स्पॉट सिल्व्हर सध्या $18.88 प्रति औंस पातळीवर आहे. दरम्यान यावेळीएचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, डॉलर निर्देशांकात वाढ झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमती दबावाखाली आहेत. स्पॉट मार्केटमध्ये डॉलर इंडेक्स सध्या 112.72 च्या पातळीवर असून हा एक नवीन रेकॉर्ड आहे.
आयुष्मान भारत योजनेला चार वर्षे पूर्ण, योजनेमुळे गरिबांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य