नुकताच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court Result) शिंदे व ठाकरे गटातील सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. यामध्ये १६ आमदारांच्या अपात्रते बाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला आहे. या निर्णयामुळे शिंदे सरकार बचावले आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा ( Maharashtra Cabinate Expansion) मार्गही मोकळा झाला आहे. यामुळे लवकरच शिंदे- फडणवीस सरकारचा उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील व भाजपामधील अनेक आमदार पाण्यात देव घालून बसल्याचे सांगण्यात येत आहे. ( Shinde – Fadanvis Government)
शेतकऱ्यांनो फळबाग लावायचा विचार करताय? तर मग ही बातमी तुमच्यासाठी; सरकार देतंय अनुदानासह मोफत रोपे
२० आमदार घेणार शपथ –
शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी वक्तव्य केले आहे. अगामी आठ ते दहा दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. एवढंच नाही तर त्यावेळी एकूण वीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशीही माहिती त्यांनी दिली. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विधान केले होते.
धक्कादायक घटना! लिफ्टमध्ये मान अडकल्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
मागील अनेक महिन्यांपासून शिंदे- फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. यामुळे पक्षातील अनेक आमदार नाराज असल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. मात्र शिंदे गट आता कायदेशीर लढाईमधून बऱ्यापैकी बाहेर पडला आहे. यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
Jayant Patil । ब्रेकिंग! जयंत पाटील यांना पुन्हा ‘ईडी’ची नोटीस