Cabinate Expansion | अखेर प्रतिक्षा संपली! शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील; ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

Cabinet Expansion | Finally the wait is over! Green light for Shinde-Fadnavis government's second cabinet expansion; The names of 'these' leaders are in discussion

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) प्रदेश कार्यकारिणी समितीची बैठक काल (ता.१८) पुण्यात पार पडली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा (J. P. Nadda) यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला जे.पी. नड्डा यांनी हिरवा कंदील दाखवल्याचे सांगण्यात येत आहे. या महिन्याच्या अखेरीस राज्य सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

घनश्याम दराडेचा गौतमी पाटीलला गंभीर इशारा; म्हणाला, “महाराष्ट्राचा बिहार करू नये नाहीतर…”

सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर दिलेल्या निर्णयानंतर शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराचा ( Maharashtra Cabinate Expansion) मार्गही मोकळा झाला आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून शिंदे- फडणवीस सरकारचा उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार ? याबाबत चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील व भाजपामधील अनेक आमदार पाण्यात देव घालून बसल्याचेही सांगण्यात आले होते.

Car Accident | भीषण अपघात! रस्त्यावर गाड्यांची वर्दळ कमी म्हणून वेगात कार चालवणे पडले महागात! अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत वक्तव्य केले होते. ‘अगामी आठ ते दहा दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार’ असा दावा संजय शिरसाट यांनी केला होता. दरम्यान या मंत्रिमंडळ विस्तारासाठी बच्चू कडू, भरत गोगावले, संजय शिरसाट या नेत्यांची नावे विशेष चर्चेत आहेत.

Loksabha Elections | अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची लगबग सुरू; आज मातोश्री वर होणार महत्त्वाची बैठक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *