Eknath Shinde । सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. मागच्या दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांनाच चक्रावून सोडणारी घटना घडली. अजित पवार (Ajit pAwar) यांनी अचानक बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या. अजित पवार यांनी काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे फडणवीस सरकारसोबत युती केली. यामुळे नऊ जणांचा शपथविधी पार पडला. मात्र शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांचं काय? हा प्रश्न कायम होता. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ (Eknath Shinde) शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बिग ब्रेकिंग! राष्ट्रवादीला मोठा धक्का, अमोल कोल्हे देणार शरद पवारांकडे खासदारकीचा राजीनामा
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार एक आठवड्यात होईल असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिल आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. त्यामुळे आता मंत्रिपदाची माळ कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडणार. त्याचबरोबर शिंदे गटाला किती मंत्रिपदं आणि खाती मिळणार? भाजपा आमदारांना काय मिळणार हे सर्व पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. (Latest Marathi News)
डबल इंजिनचं सरकार आता ट्रिपल इंजिनचं झालंय, एकनाथ शिंदे यांच वक्तव्य
पत्रकारांनी यावेळी काँग्रेस फुटणार का? असा प्रश्न देखील एकनाथ शिंदे यांना विचारला यावर उत्तर देत ते म्हणाले, “आता जागा फुल झाल्या आहेत. असं मिश्किल उत्तर एकनाथ शिंदे यांनी देताच एकच हशा पसरला. त्यांच्या वक्तव्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, रात्री उशिरा शिंदे यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना अभिवादन केलं.
Sharad Pawar । “अजित पवारांवर होणार कारवाई”, शरद पवार स्पष्टच बोलले
हे ही पाहा –