Cabinet Metting । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यात 9 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. पशुसंवर्धन विभागाने अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला, तर वस्त्रोद्योग विभागाने शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य प्रदान करण्याची घोषणा केली. कृषी विभागाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा केली असून विहिरी, शेततळे आणि वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्याचे ठरवले आहे.
महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे 36,000 पेक्षा अधिक केंद्रे प्रकाशमान होणार आहेत. कामगार विभागाने औद्योगिक कामगार न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते देण्याचा निर्णय घेतला, आणि पशुसंवर्धन विभागाने थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ करण्याची घोषणा केली. जलसंपदा विभागाने धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे पुनर्वसन विशेष भाग म्हणून करण्याचा निर्णय घेतला, तर विधी व न्याय विभागाने विविध न्यायालये स्थापन करण्याची घोषणा केली.
याशिवाय, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सुमारे 1 कोटी 60 लाख भगिनींना 4,787 कोटींचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे अन्य कोणत्याही योजनांना बंद करण्यात येणार नाही, असे मंत्रिमंडळाने स्पष्ट केले. राज्यातील मोठी धरणे 2018 नंतर शंभर टक्के भरली असल्याचेही जाहीर करण्यात आले.
Ajit Pawar | अजित पवारांच्या तब्येतीत बिघाड, डाॅक्टरांनी दिली मोठी अपडेट