
पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे १३ डिसेंबरला पुणे (Pune) बंदची हाक दिली आहे. या प्रकरणी सर्व पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या सून पुण्यातील सर्व पक्षांनी आणि विविध संघटनांनी ही बंदची हाक दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याला जो योग्य पद्धतीने धडा शिकवेल त्याला मोफत गुवाहाटी ट्रिप
या पार्शवभूमीवर १३ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा, काँग्रेस आणि ठाकरे गट या बंद मध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान मागच्या काही दिवपासून राज्यपाल भगतसिंग यांच्या विरोधात आंदोलने होत आहेत. अनेकजण आक्रमक झाले असून वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य लोक देखील राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत. राज्यपालांना त्यांच्या पदावरून हटवावे अशी मागणी जोर धरत आहे.
शेतकऱ्यांनो ‘या’ पद्धतीने सुरू करा स्वतःचा पशुखाद्य व्यवसाय; दुग्धव्यवसायात होणार वाढ
मात्र अजून देखील भाजपकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आहे. त्यामुळे भाजपविरोधात देखील सगळे आक्रमक झाले असून भाजपने माफी मागावी, अशी मागणी सर्व पक्षांनी केली आहे. दरम्यान, स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध केला होता. मात्र आता पुण्यातील सर्व पक्ष आणि संघटना एकत्र आल्या असून त्यांनी बंदची हाक दिली आहे.
एकाच वेळी दोन तरुणींशी लग्न करणाऱ्या तरुणाबाबत भयानक सत्य समोर; ऐकून तुम्हालाही बसेल धक्का