Site icon e लोकहित | Marathi News

calls : कॉल्स आणि SMS मध्ये होणार हे बदल, १ मे पासून येणार नवीन नियम…

calls: Changes in calls and SMS, new rules from May 1...

बनावट कॉल आणि मेसेजेस चा आपल्याला नेहमीच त्रास होत असतो. यामुळे अनेकदा आपले नुकसान देखील होते. दरम्यान देशात एक नवीन नियम येणार आहे, ज्यामुळे बनावट कॉल आणि मेसेजचा त्रास बंद होणार आहे. येत्या १ मे पासून हा नवीन नियम लागू होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAI ने कॉलिंगच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार TRAI एक नवीन फिल्टर सेटअप करणार आहे. (New Filter Set Up)

“…मग बहीण-भावाच्या शारीरिक संबंधाना मान्यता देण्याच्या याचिका येतील”, समलैंगिक संबंधांवर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने बनावट कॉल्स व मेसेजेसच्या मुद्द्यावर टेलिकॉम कंपन्यांना एक आदेश जारी केला आहे. इथून पुढे आपल्या फोन कॉल आणि मेसेज सेवेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्पॅम फिल्टर ( Artificial Intelligance spam filter) लावणे गरजेचे आहे. हे फिल्टर यूजर्सला फेक कॉल आणि मेसेज पासून सुरक्षित ठेवते. TRAI च्या नवीन नियमानुसार, फोन कॉल आणि मेसेज संबंधित सर्व टेलिकॉम कंपन्यांना १ मे पासून हे फिल्टर लावावे लागणार आहे.

जगातील सर्वात महाग ट्रॅक्टर बद्दल तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या अधिक..

एअरटेल मध्ये आधी पासूनच अशाप्रकारच्या AI फिल्टरची सुविधा आहे. दरम्यान जिओने सुद्धा आता AI फिल्टर लावण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे आता अज्ञात कॉल्स व मेसेजेसला ( Fake calls & Messages) आळा बसणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे TRAI ने आता ट्राय कॉलर आयडी फीचर सुद्धा आणले आहे. यामुळे कॉल केल्यानंतर फोटो आणि नाव डिस्प्ले होणार आहे.

Gautami Patil: बैलासमोर लचकत मुरडत नाचली गौतमी! कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क…

Spread the love
Exit mobile version