ओडिसामध्ये (Odisha) शुक्रवारी घडलेल्या भीषण अपघातामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेमुळे बऱ्याच लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही दुर्घटना कशी झाली त्याचं सत्य समोर आल आहे. मालगाडी आणि एक्सप्रेसगाडी यांच्यामध्ये धडक झाल्याची बातमी समोर आली आहे. पण यामुळे अपघातामध्ये तीन रेल्वे गाड्यांचा अपघात झाल्याचीही माहिती समोर आली आहे. हा भीषण अपघात अंगाचा थरकाप करणारा आहे. या भीषण अपघातातील दृश्य पाहून संपूर्ण देशामध्ये शोककळा पसरली आहे.
धक्कादायक घटना! मोबाईलचा स्फोट झाल्याने दहा वर्षीय मुलगा गंभीर जखमी
या अपघातामध्ये बचावलेल्या एका महिलेने तिची आपबीती सांगितली आहे. अपघात झाला त्यावेळी महिला कोरोमंडल एक्सप्रेसमध्येच वॉशरुमला गेली होती. त्यामुळे ती बचावली असल्याच स्वतः त्या महिलेने सांगितले आहे. मात्र ही महिला वॉशरुममधून बाहेर येताच तिला धक्का बसला कारण ट्रेन कलंडली होती. लोक एकमेकांवर पडलेले होते. चारही बाजूने प्रेतांचा खच होता. असं तिने सांगितले आहे.
रेल्वेच्या भयाण अपघाताचे खरं कारण आलं समोर; वाचून तुमच्या अंगावर येईल काटा
वॉशरुममध्ये असल्यामुळे ही महिला बचावली. अपघातानंतर या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान, ओडिसामध्ये झालेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 280 लोक मृत्युमुखी पडली आहेत. तर 900 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी आहेत. जखमी लोकांना वाचवण्यासाठी अटातटीचे प्रयत्न चालू आहेत.