पुण्यामध्ये कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर कसबा पोटनिवडणुक जाहीर झाली. ( Kasba Assembly Elections 2023) ही निवडणूक बिनविरोध होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र या निवडणुकीत चुरशीचा सामना रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
Gautam Adani: उद्योगपती गौतम अदानी यांना अजून एक मोठा धक्का!
या दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. दरम्यान, आजपासून प्रचाराची खरी रणधुमाळी सुरु होणार आहे. कारण आज सर्व पक्षातील दिग्गज नेते प्रचार करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.
एका जागेसाठी 21 उमेदवार! कसबा विधानसभा पोटनिवडणुकी कोण कोण उतरलंय मैदानात? वाचा सविस्तर
यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटी, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आदित्य ठाकरे हे सर्व दिग्गज नेते आज पुण्यात प्रचारासाठी येणार आहेत. यामुळे कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रमुख पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येणार असल्याचं चित्र दिसत आहे.
आदिलवर केलेल्या मारहाणीच्या तक्रारीनंतर राखी वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये रवाना; पाहा VIDEO