Arvind Kejriwal । सर्वात मोठी बातमी! दिल्लीत लागू होणार राष्ट्रपती राजवट?

Arvind Kejriwal

Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण प्रकरणात ईडीने (ED) अटक केली आहे. ईडीने केजरीवाल यांची सुमारे दोन तास चौकशी केली आणि त्यानंतर टीम त्यांना ईडी कार्यालयात घेऊन गेली. ईडीच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खूप मोठी खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)

Vijay Shivtare । चिन्ह कमळ का असेना, पण बारामतीतूनच लढणार, विजय शिवतारेंमुळे वाढले अजितदादांचे टेन्शन

दरम्यान, दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट (President’s rule) लागू होण्याची शक्यता आहे. कारण दिल्ली एक केंद्रशासित प्रदेश आहे. या ठिकाणी आता उपराज्यपाल विनय सक्सेना (Vinay Saxena) यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. कायद्यामध्ये उपराज्यपाल यांना असे अधिकार असल्याने संवैधानिक यंत्रणेला खोडा निर्माण झाला किंवा घटनात्मक पेच निर्माण झाला तर विनय सक्सेना हे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करु शकतात.

Sanjay Raut । संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ! दाखल झाली निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमकं प्रकारण काय?

कारवाईनंतर केजरीवाल देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे की केजरीवाल मुख्यमंत्री राहतील. ते राजीनामा देणार नाही. मंत्री आतिशी म्हणाले की, केजरीवाल मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील. ते म्हणाले की, अरविंद केजरीवाल ही एक कल्पना आहे, त्यांना संपवता येणार नाही. आप आणि अरविंद केजरीवाल यांना रोखण्याचा हा कट आहे. लवकरच ते भाजपला उत्तर देतील.

Sharad Pawar । अजित पवारांकडं गेलेले अनेक जण आपल्याकडं येणार, शरद पवारांचा मोठा दावा

Spread the love