![Can the wives of two ministers get along? Answering this, Amrita Fadnavis said…](http://elokhit.com/wp-content/uploads/2022/08/Amruta-Fadanvis-2-1024x538.jpg)
मुंबई : ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम झी मराठीवर चालू आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेल्या महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली.
या कार्यक्रमात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी अनेक खुलासे केले. यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, दोन मंत्र्यांच्या बायकांचं एकत्र जमतं का? यावर उत्तर देत अमृता फडणवीस म्हणाल्या, “कोणताही मंत्री असो त्यांच्या पत्नीला घराबाहेर पडायला तेवढा वेळच मिळत नाही. सतत घरात काही ना काही कामं असतात. पण एक सांगते की, दोन मंत्री यांच्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. मात्र दोन मंत्र्यांच्या बायकांचं एकमेकांशी जमतं.”
अमृता फडणवीसांनी प्रश्नाचे उत्तर देताच त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतो. व्हिडीओ पाहून काही लोक त्यांना ट्रोल देखील करतात.