राज्यात यंदा पावसाने (Rain in Maharashtra) उशिरा हजेरी लावली. त्यात राज्यातील काही जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरवली. पावसाअभावी पिके करपू लागल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. हवामान खात्याने (IMD Alert) येत्या काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला आहे परंतु जर या दरम्यान पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. राज्यात दुष्काळही पडू शकतो. (Latest Marathi News)
Ajit Pawar । अजितदादांवर पुतण्याचा पहिल्यांदाच निशाणा, म्हणाला; “त्या चौकशीचं काय झालं?…”
बोरवेल किंवा विहीर खोदण्यासाठी पैशांची गरज पडते. यामध्ये लाखो रुपये खर्च होतात. परंतु अनेकदा लाखो रुपये खर्चून पाणी लागत नाही. अशातच अनेकजण पाणाड्याची मदत घेत आहेत. अनेकांना पाणी देखील लागते. परंतु आता खरंच हातावर नारळ ठेवून जमिनीतील पाण्याचा शोध लागतो का असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Water in Land)
Agriculture News । मिळवायचा असेल लाखोंचा नफा तर आजच करा बांबूची शेती, सरकारही करेल मदत
असा घेतला जातो पाण्याचा शोध
ग्रामीण भागात त्यांच्या शेतामध्ये बोरवेल किंवा विहीर खोदण्यासाठी पाणी आहे का हे पाहण्यासाठी पाणाड्याची म्हणजेच फिल्ड सर्वेअरची मदत घेतात. अशा व्यक्ती जमिनीतील पाण्याचा शोध घेण्यासाठी इंग्रजी वाय अक्षराप्रमाणे दिसणारी कडुनिंबाची काडी, नारळ, पाण्याने भरलेली दोन भांड्यांचा वापर करतात. ते पाणी शोधण्याकरिता तळहातावर नारळ ठेवून नारळाची शेंडीचा भाग हा हाताच्या बोटांच्या दिशाला करतात.
Sharad Pawar । “शरद पवार खुनी आहेत”; टीका करताना शिवसेनेच्या बड्या नेत्याची घसरली जीभ
हा नारळ हातावर ठेवून ते त्या शेतामध्ये फिरतात. समजा ज्या ठिकाणी हातावरील नारळ सरळ उभा राहिला तर जमिनीत पाणी आहे, असे सांगतात. वाय आकाराच्या कडुनिंबाच्या काठीचा नारळासारखच वापर करतात. तसेच एका तांब्यात पाणी घेऊन तो तांब्या हातावर ठेवला ठेवून ते त्या शेतामध्ये फिरतात. ज्या ठिकाणी त्या तांब्यातील पाणी सांडते त्या ठिकाणी विहीर खोदली जाते.
ही पद्धत अवैज्ञानिक आहे का?
भूगर्भ शास्त्रज्ञांच्या मतानुसार, नारळ किंवा कडुलिंबाच्या फांद्या यांचा वापर करून पाणी शोधण्याची पद्धत ही अवैज्ञानिक आहे. यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसते. अनेकवेळा हजार फुटापर्यंत बोरवेल जाऊन त्या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत कमी असल्यामुळे पाणी लागत नाही. वैज्ञानिक पद्धतींचा वापर करूनच जमिनीत पाणी आहे की नाही ते समजते.
वैज्ञानिक पद्धत
भूगर्भ शास्त्रज्ञ जमिनीत पाणी आहे की नाही हे पाहण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्याचा सल्ला देतात. यात रेझीस्टीव्हीटी मीटरचा वापर करतात. याच्या साह्याने जमिनीतील थरातील विद्युतीय प्रतिकारशक्तीचा अंदाज लावता येतो. त्यावर आधारित एक ग्राफ काढून पाण्याचा शोध घेण्यात येतो. जमिनीमध्ये पाणी किती खोल आहे? हे पाहण्यासाठी एका विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करतात.
Milk Cow Species । ‘या’ आहेत सर्वाधिक दूध देणाऱ्या गाई, दिवसाला देतात 50 लिटरपेक्षा जास्त दूध