Supriya Sule । पुणे : राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election 2024) पार पडणार आहेत. निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर करू शकते.आगामी निवडणुका सर्वच पक्षांसाठी अटीतटीच्या असणार आहेत. कारण शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडली आहे. यंदा सर्वांचे विशेष लक्ष बारामती मतदारसंघाकडे असणार आहे. (Latest marathi news)
कारण या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होण्याची शक्यता आहे. अशातच आता सुप्रिया सुळेंनी बारामतीतून उमेदवारी जाहीर केली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण एका व्हॉटसअॅप स्टेटसवरून (Supriya Sule WhatsApp Status) ही चर्चा रंगली आहे. सुप्रिया सुळे यांनीच हे स्टेटस ठेवले आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, मी उमेदवारी जाहीर केली नसून मी फक्त तिकीट मागितलं आहे. पक्षाला नवीन चिन्ह मिळालं असल्याने ते मी स्टेटसला ठेवलं आहे. माझ्या कामामुळे मला उमेदवारी मिळावी, ही मागणी केली असून मी या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.
Sambhaji Bhide । संभाजी भिडेंची अडवली कार, प्रचंड घोषणाबाजी देत दाखवले काळे झेंडे, नेमकं कारण काय?