Site icon e लोकहित | Marathi News

“भांडवलवादी सरकारचे जनतेविरुद्ध अघोषित युद्ध सुरूच” – हिमांशू कुमार

"Capitalist government's undeclared war against the people continues" - Himanshu Kumar

औरंगाबाद:- सद्यस्थितीला भांडवलवादी सरकारचे जनतेविरुद्ध अघोषित युद्ध सुरूच असल्याची टीका गांधीवादी तथा मानवाधिकार कार्यकर्ते हिमांशू कुमार यांनी केली. सोमवारी रुक्मिणी सभागृहात निरंजन टकले यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ‘नक्षलवादाचे गांधीवादी विश्लेषण ‘ या विषयावर ही विशेष मुलाखत एमजीएम विद्यापीठाच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती.

मुलगा पत्ते खेळताना सापडला वडिलांना अन् वडिलांनी बेदम मारला; पाहा VIDEO

स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी आणि भगतसिंग यांनी ‘ब्रिटिशांच्या भांडवलवादी विकासाची परिभाषा आणि भारतीय समाजाचे भविष्य’ यावर केलेले भाष्य खरे ठरताना दिसत आहे. आजघडीला एक गरीब दुसऱ्या गरिबा विरुद्ध लढत आहे. त्याचा फायदा भांडवलवादी लोक घेत आहेत. भांडवलवाद्यांचे श्रम आणि संसाधनावर ताबा मिळवण्याचे युद्ध आणखीही सुरूच आहे. या अघोषित अदृश्य युद्धातून विकासाच्या नावाखाली सरकारकडून आदिवासींच्या जमिनी घेतल्या जात आहेत. हजारो आदिवासी महिला मारल्या गेल्या. कित्येक महिला बलात्काराच्या बळी ठरल्या आहेत. आजच्या भांडवलवादी जीवन शैलीतून भारतीय समाज संपुष्टातील येईल. भांडवलवादाचे पुढील युद्ध भारतीय कृषी सोबत होणार असल्याचे संकेत देत किसान आंदोलन हा त्याचाच एक प्रकार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. निरंजन टकले यांनी घेतलेल्या प्रश्नोत्तर स्वरूपातील मुलाखतीमुळे हिमांशु कुमार यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांचा उलगडा झाला.

मतदानासाठी थेट दुबईमधून बारामतीत आली ‘ही’ जोडी; गावाला चांगला सरपंच मिळावा म्हणून पार पाडले कर्तव्य

या कार्यक्रमाला एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलपती विलास सपकाळ, कुलसचिव आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके, गांधी अध्यासन केंद्राचे संचालक जॉन चेल्लादुराई इत्यादींची उपस्थिती होती.

हिवाळी अधिवेशनात ‘या’ मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता

प्रतिनिधी – ज्ञानेश्वर ताले

Spread the love
Exit mobile version