
Car Accident । नाशिक : हल्ली दररोज कुठे ना कुठे अपघात (Accident) होत असतात. या अपघातात कित्येक जणांचा जागीच प्राण जातो. रस्ते कितीही चांगले बनवले तरीही अपघात नियंत्रणात आले नाहीत. वाढते अपघात थांबवणे हे जणू आव्हानच बनले आहे. सध्या एक भीषण अपघात झाला असून या अपघातात तरुण-तरुणी जागीच ठार झाले आहेत. (Car Accident in Nashik)

Motorola edge 50 Pro । बजेट ठेवा तयार! बाजारात लवकरच येतोय ‘हा’ शक्तिशाली फोन, जाणून घ्या खासियत
गंगापूर रोडवरील बारदान फाटयाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. गंगापूर धरणाजवळील बोट क्लबमध्ये चार जण गेले होते. पण परत येताना त्यांच्या कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने ही कार तीन वेळा पटली होऊन झाडावर आदळली. यावेळी कारमध्ये पुढे बसलेले दोघेजण थोडक्यात बचावले. पण मागे बसलेले दोघेही जागीच ठार झाले. (Latest marathi news)
Politics News । सोलापूरच्या राजकारणात मोठा भूकंप! अमोल कोल्हे भाजप नेते मोहिते पाटलांच्या भेटीला
मृतांमध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना मदत केली. या भीषण अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या बारदान फाटयाजवळ झालेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.