Car accident । नाशिक : नाशिकमधून सध्या अपघाताची एक दुर्देवी घटना समोर येत आहे. आज दुपारच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात भरधाव कार झाडावर आदळून अपघात (Accident) झाला आहे. दिंडोरी रोडवर ढकांबेगावाजवळ हा भीषण अपघात झाला असून या अपघातात ५ ते ६ जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. (Accident in Nashik)
Manoj Jarange Patil । सर्वात मोठी बातमी! जरांगे पाटील लढवणार विधानसभेची निवडणूक
याबाबत अधिक माहिती अशी की, आज नाशिकमध्ये भरधाव कार झाडाला आदळली. (Car Accident in Nashik) ही धडक इतकी जोरात होती की या अपघातात ५ ते ६ जण ठार असल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Ashok Chavan । अशोक चव्हाणांबाबत काँग्रेसमधून धक्कादायक बातमी समोर!
अपघातानंतर नागरिकांनी मदतीसाठी धावाधाव केली. अपघातग्रस्तांना नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी अपघातग्रस्तांना मृत झाल्याचे घोषित केले. यामुळे मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ढकांबेगावाजवळ झालेल्या या अपघातामुळे अपघातग्रस्तांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत.
Eknath Shinde । निवडणुकीच्या तोंड्यावर एकनाथ शिंदे यांचे सर्वात मोठे वक्तव्य!