Car Accident News । सध्या अपघाताची एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे.भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ नियंत्रणाबाहेर जाऊन एका खांबाला धडकली आणि भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोनजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद-हरिद्वार राज्य महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.
Navneet Rana । नवनीत राणांच्या अडचणी वाढल्या! महायुतीतल्या ‘या’ तिसऱ्या बड्या नेत्याने थोपटले दंड
मुरादाबादमधील कंठ पोलीस स्टेशन हद्दीतील रसूलपूर रेल्वे गेटजवळ रविवारी सकाळी झालेल्या या अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला असून त्यात प्रवास करणाऱ्यांना या अपघाताचा फटका बसला आहे. या गाडीतून एकाच कुटुंबातील लोक डेहराडूनहून मुरादाबादला जात होते. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. सर्व मृत हे डेहराडूनचे रहिवासी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
Crime News । अत्याचाराच्या घटनेनं बीड जिल्हा हादरला! एकटेपणाचा फायदा घेत घरात आला आणि…
या अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीने सांगितले की, ते डेहराडूनहून मुरादाबादला परतत असताना वाटेत हा अपघात झाला. कारमध्ये सात जण होते. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.
Uddhav Thackeray । राजधानी दिल्लीत उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं खुलं आव्हान, म्हणाले; “हिंमत असेल तर…”