Car Accident News । अपघाताच्या घटना या आपल्याला दररोजच ऐकायला मिळत आहेत. रस्ते कितीही चांगले झाले तरी अपघात कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या देखील नागपूर-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. महामार्गावरून चुकीच्या दिशेने दुचाकी चालवीत दुभाजक ओलांडण्याचा प्रयत्न करताना भरधाव येणाऱ्या कारदुचाकीला मोठी धडक दिली आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये पती जागीच ठार झाला तर पत्नीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. नागपूर तुळजापूर महामार्गावरील परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. (Wardha Accident News)
घटनास्थळावर उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी दोघेही दुचाकीने वर्धा या ठिकाणाहून नागपूरकडे जात होते. मात्र यावेळी ते चुकीच्या दिशेने दुचाकी चालवत महामार्गावरील दुभाजक ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान नागपूरहून वर्ध्याकडे जात असलेल्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला.
या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. यामध्ये जखमी झालेल्या पती पत्नीला तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र पतीचा रुग्णालयात जाण्याआधीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.