Accident News । शिवसेनेच्या आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Accident News

Accident News । रायगड : अपघाताचे (Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अनेक निष्पाप लोकांना शुल्लक कारणावरून अपघातामुळे आपला जीव गमवावा लागतो तर काहींना कायमच अपंगत्व येऊन जाते. सध्या देखील अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. (Shivsena MLA Car Accident)

Lok Sabha Elections । भाजपला मोठा धक्का! गौतम गंभीर पाठोपाठ आणखी एका खासदाराने घेतला राजकारणातून संन्यास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात रायगड जिल्ह्यामधील उसडी गावातील टोल नाक्याजवळील तळारोड या परिसरात झाला असून अपघातात महेंद्र दळवी यांच्या गाडीला दुचाकीस्वाराने धडक दिली. (Car Accident) ही धडक इतकी जोरात होती की यात दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

Maratha Reservation । मोठी बातमी! मराठा समाजाचे प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार दोन उमेदवार

तर या अपघातामध्ये दळवी यांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात दळवी यांच्या गाडीच्या एअर बॅगही उघडल्या गेल्या. या अपघाताची माहिती मिळताच तातडीने स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपघात झाल्यानंतर दळवी यांना जवळच्या रूग्णालयात दाखल केलं.

Sharad Pawar । … तर आम्ही तुमच्यासोबत राहू, शरद पवारांनी दिली सरकारला खात्री

Spread the love