दिवसेंदिवस रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. आज (ता.१९) सकाळी पहाटे तीनच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ( Mumbai-Pune express Highway) भीषण अपघात झाला आहे. उर्से टोल नाक्याजवळ मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या कारने आयशर मागून जोरात धडक दिली आहे. या अपघातात कारमध्ये असणाऱ्या सहा प्रवाशांपैकी एका पंधरा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यु झाला आहे. तसेच दोन जण गंभीर जखमी झाले असून उर्वरित प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. (Death of 15 year old girl in car accident)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धडक देणारी कार मुंबईवरून पुण्याला येत होती. रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्याने कार प्रचंड वेगात होती. यामुळे समोर चाललेल्या आयशरला ही कार जोरात धडकली आणि कार आयशरच्या मागच्या बाजूस अडकली. कार मध्ये असणाऱ्या लोकांच्या काही लक्षात यायच्या आत हा अपघात झाला.
घनश्याम दराडेचा गौतमी पाटीलला गंभीर इशारा; म्हणाला, “महाराष्ट्राचा बिहार करू नये नाहीतर…”
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आय.आर. बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाली. यावेळी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना त्वरित उपचारासाठी पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये कारच्या पुढील भागचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.