Car Prices । आपला देश झपाट्याने प्रगती करत आहे. लोकांचे उत्पन्नही वाढत आहे. वाढलेल्या उत्पन्नामुळे लोकांची स्वप्नेही मोठी झाली आहेत. याचा फायदा बाजाराला होत आहे. महागड्या घड्याळांपासून महागड्या कारपर्यंत सर्वच वस्तूंची विक्रमी विक्री देशात होत आहे. जगातील सर्वात महागड्या कार उत्पादक कंपन्या BMW, Audi, Mercedes, Porsche आणि Lamborghini भारतात रेकॉर्डब्रेक कार विकत आहेत.
आता ताजी आकडेवारी जर्मन लक्झरी कार उत्पादक बीएमडब्ल्यूने जाहीर केली आहे. कंपनीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, BMW ने 2023 मध्ये भारतात 22,940 युनिट्सवर लक्झरी कार आणि मोटारसायकलींची विक्रमी विक्री नोंदवली.
आम आदमी पार्टीच्या वतीने सोमेश्वर कारखान्याला निवेदन, ऊस वेळेत तोडण्याची केली मोठी मागणी
बीएमडब्ल्यूच्या या मॉडेलला प्रचंड मागणी
कंपनीने 2023 मध्ये BMW आणि Mini ब्रँड्सच्या एकूण 14,172 युनिट्स, तर 8,768 मोटारसायकल (BMW Motorrad) विकल्या. गेल्या वर्षी कंपनीची विक्री 19 टक्क्यांनी वाढून 2022 मध्ये 19,263 युनिट्स झाली. बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पवाह म्हणाले की, २०२३ हे बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियासाठी विक्रमी कमाईचे वर्ष होते. ‘BMW, Mini आणि BMW Motorrad’ या तीन ब्रँडने आतापर्यंत सर्वाधिक युनिट्स विकल्या आहेत.
Ajit Pawar । अजित पवार पुन्हा शरद पवार यांना मोठा धक्का देणार; हालचालींना वेग
त्याचबरोबर पुढे विक्रम पवाह म्हणाले की, BMW iX हे भारतात सर्वाधिक विकले जाणारे लक्झरी इलेक्ट्रिक वाहन आहे. पवाह म्हणाले की, समूह 2024 मध्ये 13 कार सादर करेल, ज्यात दोन EV आणि सहा बाईक आहेत. 5-सिरीज आणि X3 सह विविध मॉडेल्स सादर करण्याचीही योजना आहे. BMW ने 2023 मध्ये 23 नवीन उत्पादने सादर केली होती.
Chandrakant Patil । मोठी बातमी! विद्यार्थ्यांनी पुण्यात अडवली चंद्रकांत पाटील यांची गाडी