
Nikhil Wagle । महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार निखिल वागळे यांना पुण्यातील एका कार्यक्रमात भाषण देण्यासाठी बोलवले होते. पण निखिल वागळे पुण्यातील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचताच भाजप (BJP), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांनी आधी निखिल वागळे यांच्या गाडीवर शाई फेकून नंतर त्यांच्या गाडीवर हल्ला केला. यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)
Chhagan Bhujbal । सर्वात मोठी बातमी! अज्ञात व्यक्तीने दिली छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी
याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) निखील वागळे यांची गाडी फोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच महाविकास आघाडीचे नेते-कार्यकर्ते, निखील वागळे आणि निर्भय बनो (Nirbhay Bano Meeting) सभेचे आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यात एकूण २०० ते २५० लोकांचा समावेश आहे. सभेच्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश दिला असतानाही जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.
Accident news । समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी
इतकेच नाही तर पोलिसांनी निखील वागळे यांच्यावर देखील गुन्हा दाखल (Case filed against Nikhil Wagle) केला आहे. निखिल वागळे हे एका विशिष्ट मताचे पत्रकार म्हणून ओळखले जातात आणि अनेक राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. वागळे यांनी मोदींविरोधात काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोदी समर्थक वागळे यांच्यावर नाराज होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने निखिल वागळे सुखरूप बाहेर आले मात्र त्याच्या गाडीची तोडफोड करण्यात आली.
Nikhil Wagle । निखिल वागळे यांच्या गाडीवरील हल्ल्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया