Cashless Treatment । सर्वात मोठी बातमी! रस्ते अपघातातील जखमींना सरकार कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध करून देणार, 4 महिन्यांत संपूर्ण देशात लागू होणार

Cashless Treatment

Cashless Treatment । रस्ते अपघातात बहुतांश मृत्यू हे उपचाराला उशीर झाल्यामुळे होतात. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सरकार लवकरच रस्ते अपघातात मोफत उपचाराची व्यवस्था करणार आहे. जेणेकरून जखमींना लवकरात लवकर मोफत उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील. यासाठी मोटार वाहन कायद्यात यापूर्वीच बदल करण्यात आले होते. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 4.46 लाख रस्ते अपघात झाले, ज्यात 4.23 लाख लोक जखमी झाले आणि 1.71 लाख लोकांचा मृत्यू झाला. (Cashless Treatment)

Lalit Patil Case Update । ड्रग्ज रॅकेटमधील ललित पाटील प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती, बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच या संदर्भात घोषणा करू शकते. येत्या ४ महिन्यांत संपूर्ण देशात ही सुविधा लागू केली जाईल. मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, रस्ते अपघातांमुळे सर्वाधिक मृत्यू भारतात होतात. मोफत आणि कॅशलेस वैद्यकीय उपचाराचा नियम मोटार वाहन कायद्यात समाविष्ट आहे. काही राज्यांमध्ये हा नियम पाळला जात आहे. पण आता ती संपूर्ण देशात लागू करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आम्ही संपूर्ण देशात कॅशलेस उपचार प्रणाली लागू करण्याचे आवाहन आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाला केले आहे.

Cyclone In Chennai । चेन्नईत चक्रीवादळामुळे भयानक स्थिती, महागाई वाढली; जाणून घ्या त्या ठिकाणची परिस्थिती

मोटार वाहन कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघातात जखमी झालेल्यांवर तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात यावेत. अपघातानंतर पहिल्या काही तासांत उपचार उपलब्ध झाले तर अनेकांचे प्राण वाचवण्यात आपण यशस्वी होऊ. अपघातानंतरचे पहिले काही तास सोनेरी तास म्हणतात. त्यावेळी जखमी व्यक्तीला डॉक्टरांकडे नेले तर त्याला तातडीने उपचार मिळून जगण्याची शक्यता वाढते.

Accident News । मोठी बातमी! माजी पंतप्रधानांच्या सुनेच्या गाडीला अपघात; व्हिडीओ आला समोर

शाळा, महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षा अभ्यासक्रम राबविण्यात येणार

रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी सरकार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम राबवणार आहे. याशिवाय, भारत एनसीएपी देखील राबविण्यात येत आहे. यामध्ये सीट बेल्ट रिमाइंडर आणि वाहनांमधील तांत्रिक बदल यांचा समावेश आहे.

Spread the love