पुणे शहरात दिवसेंदिवस कोयता गँगची ( Koyta Gang) दहशत वाढताना दिसत आहे. या गँगने मागील काही दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दरम्यान या टोळक्यातील काही मुलांना पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे तर काही अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात ठेवले होते. दरम्यान बालसुधारगृहात असणारे 8 सदस्य पुण्यातील येरवडा ( Yerwada)येथून पळून गेले आहेत.
अर्थसंकल्प सादर होताच विवेक अग्निहोत्रींची दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
शाळकरी मुलांच्यात कोयता संस्कृती वेगाने पसरत आहे. आपल्या मैत्रिणीशी बोलतो म्हणून 17 वर्षीय विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. अशा घटना आजकाल सातत्याने घडू लागल्या आहेत. म्हणूनच कोयता गँगला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसलीय. या पार्श्वभूमीवर कोयता गँगला पकडण्यासाठी बक्षीसे देण्यास देखील सुरुवात केली आहे.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा; मात्र पीएम किसान योजनेची रक्कम वाढली का? जाणून घ्या सविस्तर
जो कोणी कोयता गँगला पकडून आणेल त्याला रोख रक्कम देणार असल्याची घोषणा पोलिसांनी ( Pune Announcement) केली आहे. यामध्ये कोयता गँगचा आरोपी पकडून देणाऱ्यास तीन हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर पिस्तुल जवळ बाळगणाऱ्या आरोपीला व फरार आरोपीला पकडून देणाऱ्यास 10 हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय मोक्का किंवा एमपीडीएतील आरोपी पकडल्यास 5 हजारांचे बक्षीस मिळणार आहे.