Government Scheme । शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी अनुदान देण्यात येते. अनेक शेतकरी शेतीसोबतच पशुपालनाचा व्यवसाय करत असतात. अशातच आता पशुपालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गाई पाळण्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने गोशाळांना अनुदान देण्याची ‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र’ योजनेला केंद्र सरकारने पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. मागील काही वर्षांपासून ही योजना बंद ठेवण्यात आली होती. (Latest Marathi News)
Rakhi Sawant । राखी सावंतने भर पावसात डोक्यावर फोडली अंडी; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
याअंतर्गत ५० ते १०० गाईंचे पालन करणाऱ्या गोशाळांना कमीत कमी १५ लाख, १०० ते २०० गाईंचे पालन करणाऱ्या गोशाळांना २० लाख तसेच २०० पेक्षा जास्त गाईंचे पालन करणाऱ्या गोशाळांना २५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. सध्या या योजनेद्वारे ‘गाई पाळा, अनुदान मिळवा’, असा संदेश दिला जात आहे.
असंही पवार प्रेम! शेतकऱ्यानं चक्क बैलाच्या अंगावर लिहलं “आम्ही साहेबांच्या सोबत”
असा करावा अर्ज
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला येत्या १९ जुलैपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे. जर तुम्हाला या योजनेबद्दल जास्त माहिती घ्यायची असेल तर पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे जावे लागेल.
जाणून घ्या अटी
संस्थेस गोवंश संगोपनाचा तीन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.
धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेची नोंदणी गरजेची आहे.
तीन वर्षांचे लेखापरीक्षण गरजेचे आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पशुधनाच्या देखभालीसाठी आणि चाऱ्यासाठी स्वत:च्या उत्पन्नाचे साधन असायला पाहिजे.
राष्ट्रवादीचे चिन्ह कोणाला मिळणार, साहेब की दादा? शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ