चक्क बकरीच्या पिल्लाचा केला वाढदिवस साजरा ! इतकेच नाही तर, डीजे लावून फोटोसुद्धा काढले…

Celebrate the birthday of the baby goat! Not only that, DJs also took photos...

एखाद्या गोष्टीसोबत भावनिक दृष्टीने जोडली गेलेली माणसे त्या गोष्टीसाठी काहीही करू शकतात. पाळीव प्राण्यांच्या बाबतीत असे जास्त पहायला मिळते. लोक हौसेने कुत्रा किंवा मांजराच्या पिल्लांचे वाढदिवस साजरे करतात. उत्तरप्रदेश मध्ये तर चक्क पाळीव बकरीच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. या वाढदिवसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral video) होत आहे.

IND vs ENG: रोहित शर्मा ढसाढसा रडत होता ‘या’ व्यक्तीने काढली समजूत, यालाच तर म्हणतात टीम इंडिया

या व्हिडीओ मध्ये उत्तरप्रदेश ( UP) मधील कांशीराम कॉलनीत राहणाऱ्या पती-पत्नीने त्यांच्या बकरीच्या मुलाचा वाढदिवस थाटामाटात साजरा केल्याचे दिसत आहे. यावेळी त्यांनी केक कापला. इतकेच नाही तर त्यांनी बर्थडे पार्टीसाठी डीजे देखील बुक केला होता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या हौशी पती-पत्नीने बकरीच्या मुलाला मांडीवर घेऊन फोटो सुद्धा काढले आहेत.

दिव्यांगांसाठी होणार स्वतंत्र मंत्रालय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला निर्णय

लग्नानंतर अपत्यहीन राहिलेल्या या जोडप्याने बकरीच्या मुलांना आपल्या मुलांसारखे वागवले आहे. त्यामुळे त्यांनी हा वाढदिवस ( Birthday of goat’s kid) साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी देखील या वाढदिवसात सहभागी होऊन बकरीच्या मुलांना गिफ्ट दिले आहेत. आजकाल माणसे माणसांना जीव लावत नाहीत तिथं हे अपत्य प्राण्यांना इतका जीव लावत आहे. यामुळे सोशल मीडियावर या व्हिडिओला पसंती मिळत आहे.

सावधान! लॉटरीचे आमिष दाखवून होतेय फसवणूक; महिलेचे 50 हजारांचे नुकसान

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *