दिनांक 12-12-2022 रोजी इन्स्पायर्ड विंग्स एज्युकेशनल फाउंडेशन यांच्यावतीने आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुंदर हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी असे दोन गट होते. ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज खडकी या शाळेतून प्रत्येक गटातून प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
धक्कदायक! फिरायला नेतो सांगून वडिलांनीच जुळ्या मुलांना पाजले विष
दिनांक 28 जानेवारी 2022 रोजी या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इन्सपायर्ड विंग्स एज्युकेशनल फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय सौ वैशालीताई नागवडे, सचिव माननीय श्री अॅडव्होकेट प्रशांत भाऊ गिरमकर, उद्योजक माननीय श्री जीवन दरेकर, ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष माननीय श्री राजू गायकवाड, सचिवा माननीय सौ रोहिणी गायकवाड, खजिनदार माननीय श्री तुषार काळे, श्री सांगळे सर, इतर शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत; म्हणाली, मला शाहरुखची दुसरी पत्नी बनवा
पाचवी ते सातवी गटातून हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे दीपक लगड (6वी), स्वराली दळवी(7वी), तेजश्री शिंदे (5वी) व चित्रकला स्पर्धेमधील प्रथम तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे रिद्धी काळे(6वी), वैष्णवी सस्ते(7वी), गायत्री शितोळे(7वी). आठवी ते दहावी या गटातून हस्ताक्षर स्पर्धेमधील पहिले तीन विद्यार्थी पुढील प्रमाणे प्रतीक दळवी (8वी), वीरू शर्मा(10वी), वैष्णवी लगड (10वी) व चित्रकला स्पर्धेमधील पहिले तीन विद्यार्थी पुढीलप्रमाणे जय शिंदे (10वी), सुमित आटोळे(9वी), साई बेंगारे(9वी).
बिग ब्रेकिंग! भारतीय सैन्याच्या ३ विमानांचा अपघात
सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे सौ वैशालीताई नागवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व प्रचंड मेहनत करून अधिकारी व्हा अशा शुभेच्छा दिल्या व स्वत:चे, पालक, गाव, शाळा व देशाचे नाव गुणगौरवाने उंच करावे असे संबोधन केले. याचबरोबर अॅडव्होकेट प्रशांत गिरमकर, सांगळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका नांगरे मॅडम व काळभोर मॅडम यांनी केले.
“रस्ते चांगले करा, नाहीतर ठेकेदारालाच बुलडोझर खाली टाकू” – नितीन गडकरी