DA Hike । केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा! ‘इतका’ वाढणार पगार, जाणून घ्या सविस्तर

Central employees will benefit greatly! Salary will increase 'so much', know in detail

DA Hike । अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी (Central Staff) महागाई भत्त्याच्या (DA) वाढीची वाट पाहत आहेत. जर तुम्हीही केंद्रीय कर्मचारी असाल आणि तुम्ही पगार वाढीची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आता एक दिलासादायक बातमी आहे. कारण आता लवकरच या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (dearness allowance) वाढवला जाईल. याबाबत सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. (Latest Marathi News)

NCP Pawar Camp Meeting । आज पार पडणार शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक, कोणती रणनीती आखणार?

याचा फायदा फक्त केंद्रीय कर्मचारी नाही तर पेन्शनधारकांनाही होणार आहे. AICPI निर्देशांक जाहीर झाल्यानंतर महागाई भत्ता 46.24 टक्क्यांवर पोहोचला असल्याने आता केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या वर्षातील दुसऱ्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली जाईल. जर असे झाले तर कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात चांगलीच वाढ होईल. (Dearness Allowance Hike)

Sania-Shoaib Divorce । सानिया मिर्झा आणि शोएब मलिकचा घटस्फोट होणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

महत्त्वाचे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा म्हणजे दर सहा महिन्यांनी वाढ करण्यात येते. यातील पहिली वाढ जानेवारी ते जून महिन्याच्या दरम्यान तर दुसरी वाढ जुलै ते डिसेंबर महिन्याच्या दरम्यान करण्यात येते. जर आता महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ झाली तर महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होऊ शकतो.

Agriculture News | कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी संतप्त; उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर

दरम्यान, समजा हा निर्णय अमलात आला तर साहजिकच कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या पगारात चांगलीच वाढ होऊ शकते. महागाईचे आकडे पाहता डीएमध्ये ४ टक्क्यांची वाढ होईल. सरकार कधीही आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देऊ शकते.

Jitendra Awad । “मला माफ करा”, जितेंद्र आव्हाड जाणार अज्ञातस्थळी; फोनही बंद, जाणून घ्या यामागच कारण?

Spread the love