केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर (Union Minister of State for Information and Technology Rajeev Chandrasekhar) यांनी नुकतीच दिल्लीत एक महत्वाची घोषणा केली आहे. ती म्हणजे आता पुण्याजवळ (Pune) रांजणगाव (Ranjangaon) येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची (Electronic Manufacturing Cluster). महत्वाची बाब म्हणजे या योजनेतंर्गत आता दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर पाच हजार रोजगार निर्मितीचा दावा करण्यात येत आहे. स्टार्ट-अपला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारकडून या योजनेला समर्थन मिळत असून आर्थिक निधी देण्यात येणार आहे.
“..अरे, ही तर पापा की परी”, तरुणीची उभ्या ट्रकला स्कूटीची जोरदार धडक, व्हिडिओ व्हायरल
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी(PM Narendra Modi) दिलेल्या माहितीनुसार , भारत हा आता इलेक्ट्रॉनिक ग्लोबल सप्लाय चेनमध्ये एक महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. दरम्यान या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल उत्पादन देशासह जगातही पोहचतील. आता चीननंतर आता भारतात आणि व्हिएतनाम देशात देखील याचा विस्तार झपाट्याने वाढत आहे.
पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांनाच मागितले पैसे, ‘या’ जिल्ह्यात घडला धक्कादायक प्रकार
दरम्यान हा प्रकल्प तामिळनाडू, कर्नाटक, नोएडा, तिरूपती, आणि आता पुण्यातील रांजणगाव येथे राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प भविष्यात यशस्वी होईल असा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. तसेचपुढे मंत्री चंद्रशेखर म्हणाले की, सी.डॅकचा एक इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्पही महाराष्ट्रात होणार आहे. दरम्यान या प्रकल्पांची किंमत साधारण एक हजार कोटी रूपये आहे.
पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राला मिळालं गिफ्ट
पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणातंर्गत महाराष्ट्राला गिफ्ट मिळाले असल्याचं बोललं जातंय. कारण पुण्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकलपासाठी 2000 कोटींची गुंतवणूक येणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पातून 5000 रोजगार निर्मिती होणार आहे. इतकंच नाही तर 297.11 एकर जागेवर हे क्लस्टर साकारण्यात येणार आहे.
Instagram: बिग ब्रेकिंग! इंस्टाग्रामचे अकाउंट होतंय अचानक सस्पेंड
दरम्यान यासाठी 492.85 कोटी रुपये एकूण खर्च केले जाणार आहे. तर केंद्र सरकार महाराष्ट्राला 207.98 कोटी रुपये देणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्रकल्पातंर्गत आयएफबी रेफ्रिजरेशनचे काम सुरु करण्यात आलं आहे, 450 कोटींची या एकट्या कंपनीची गुंतवणूक आहे. दरम्यान या प्रकलपाच्या निमित्ताने आता इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग महाराष्ट्रात येणार आहेत.
Sharad Pawar: मोठी बातमी! शरद पवार यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल