थोड्याच दिवसात रब्बी हंगाम (Rabi season) सुरु होणार आहे. परंतु हा हंगाम सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांसाठी (Farmers) महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या रब्बी हंगामात युरिया खताची (Urea fertilizer) गरज भासू शकते. मात्र युरियाचा तुटवडा असल्यामुळे येत्या काही दिवसांत खतांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एवढच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) युरियाच्या कच्च्या मालाच्या वाढत्या किंमतीचा परिणाम होऊ शकतो.
IAS: “… मग उद्या कंडोम देखील मोफत द्यावे लागतील”, आयएस अधिकाऱ्याचे वक्तव्य चर्चेत
कारण देशात कच्च्या मालाची आयात कमी झाल्याने देशात युरिया (Urea) खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात युरिया खतासाठी मोठा त्रास सहन करावा लागू शकतो, अशी भीती आतापासून व्यक्त केली जात आहे. तसेच यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी पिकाखालील क्षेत्रात वाढ होणार आहे. म्हणून गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक युरिया खताची गरज भासणार आहे.
Supriya sule: शरद पवार पुन्हा सत्तेत येणार? सुप्रिया सुळेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या…
केंद्र सरकारने केली युरियाची किंमत निश्चित
एफपीओशी संबंधित शेतकरी संतप्त झाले आहेत, कारण मार्फेड भोपाळने एफपीओना खत देणे बंद केले आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी या समस्येबाबत शेतकऱ्यांना खत मिळावे असे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. म्हणून आत्तापासूनच शेतकऱ्यांना 400 ते 500 रुपयांना युरिया खताची पोती खरेदी करावी लागत आहे. केंद्र सरकारने युरियाची किंमत निश्चित केली आहे.शासनाने शेतकऱ्यांना युरिया व इतर खतांच्या किमतीबाबत दिलासा दिला आहे. परंतु हा दिलासा काळ्याबाजारामुळे नगण्य असला तरी शासनाच्या नावाने खते मिळत नसल्याने शेतकऱ्यांना जास्त पैसे देऊन खते खरेदी करावी लागत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! विवाहित-अविवाहित प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार
वेगवेगळ्या पोत्यांवर वेगवेगळी किंमत
1)NPK – रु. 1,470 प्रति बॅग (50 किलो)
2)युरिया – 266.50 रुपये प्रति बॅग (45 किलो)
3)एमओपी – रु 1,700 प्रति बॅग (50 किलो)
4)डीएपी – 1,350 रुपये प्रति बॅग (50 किलो)
एलपीजी ग्राहकांनो सावधान! आता वर्षभरात केवळ 15 तर महिन्याला फक्त 2 सिलेंडर मिळणार