Site icon e लोकहित | Marathi News

Viral Message: केंद्र सरकार विद्यार्थ्यांना देणार मोफत लॅपटॉप?

Central government to give free laptop to students?

दिल्ली: केंद्र सरकारकडून (central government) अनेक सरकारी योजना चालवल्या जातात, ज्यामध्ये महिला, विद्यार्थी आणि अनेक गरीबांसाठी अनेक प्रकारची मदत केली जाते. याशिवाय अनेक राज्य सरकारांनी विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपही (free laptop) दिले आहेत. अलीकडे सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तुम्ही एका लिंकद्वारे लॅपटॉपसाठी अर्ज करू शकता. चला जाणून घेऊया तुम्ही नोंदणी कशी करू शकता आणि या मेसेजचे सत्य काय आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील पट्ठ्या लिंबातून कमवतोय वर्षाकाठी चार ते साडेचार लाख रुपये

पीआयबीचे नेमके ट्विट काय

पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘http://pmssgovt.online’ या वेबसाइटवर दावा केला जात आहे की, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय लॅपटॉप योजना 2022’ योजनेअंतर्गत सरकार अकरावीच्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देणार आहे. फॅक्ट चेकिंगनंतर पीआयबीने ही वेबसाइट पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाही असंही स्पष्टीकरण दिले आहे.

अल्पवयीन मुलाला फुस लावून नेले पळवून, पुढील तपास सुरू

Spread the love
Exit mobile version