
दिल्ली : सध्या सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त आहे. अशातच तांदळाच्या वाढत्या किंमती पाहून केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी एक महत्वाचा निर्णय घेतलाय. मागच्या काही दिवसांपासून तांदळाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती, त्यामुळे वाढत्या किंमती पाहून केंद्र सरकारने गुरुवारी एक मोठा निर्णय घेतलाय. एकीकडे बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20 टक्के कर लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे तुकडा तांदळाच्या निर्यातीवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
निर्यातीवर कर
सध्या सरकारी गोदामांमधून कमी साठा आणि भातशेती क्षेत्रात झालेली घट आणि तांदळाची मोठ्या प्रमाणात निर्यात याचा विचार करून केंद्र सरकारने निर्यातीवर कर लावला आहे . गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या सरकारी गोदामांमध्ये सुमारे 22 लाख टनांचा साठा कमी झालाय. त्याचबरोबर मागच्या वर्षीच्या तुलनेत धान्याचे क्षेत्र सुमारे 23 लाख हेक्टरने मागे पडले आहे.
Kavya Yadav: अखेर प्रसिद्ध युट्यूबर काव्या यादव सापडली, पालकांनी मानले पोलिसांचे आभार
देशामध्ये तांदळाचा पुरवठा मर्यादित करण्यासाठी केंद्र सरकारने तांदळाच्या निर्यातीवर कडक नियम देखील लावले आहेत. त्यामुळे आता निर्यातीचे नियम जाहीर झाल्यानंतर त्याचे भाव किती कमी होणार की वाढणार? हा प्रश्न सर्वाना उपस्थित झाला आहे. कारण गव्हाच्या निर्यातीवर बंदी असतानाही बाजारात मात्र गव्हाचे भाव जास्तच चढलेलेच होते.
राज्यातील शेतकरी राजासाठी आणखी एक योजना, वर्षाअखेरीस मिळणार ‘एवढी’ रक्कम