आजकाल ऑनलाइन शॉपिंग मुळे लोक घरच्या घरी बसून वस्तू खरेदी करतात. यामुळे लोकांच्या वेळेची व पैशाची बचत होते. परंतु, ही ऑनलाइन शॉपिंग अजून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली न्हवती. शेतकऱ्यांना पिकांसाठी कीटकनाशके किंवा इतर औषधे घेण्यासाठी दुकानात जावे लागत होते. मात्र, केंद्र सरकारने ( Central Government) नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयानुसार शेतकरी शेतीसाठी लागणारी कीटकनाशके घरी बसून मागवू शकतात.
उदयनराजे भोसले नाराज?, प्रतापगडावरील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत
भारतातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपन्या ( E-commerse companies) मागील काही दिवसांपासून, शेतकऱ्यांपर्यंत कीटकनाशके पोहोचवण्याचा परवाना हवा असल्याची मागणी करत होत्या. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्रालयाने कीटकनाशक नियम 1971 मध्ये महत्त्वाचे बदल करून कीटकनाशकांच्या व्यापारासाठी परवाना देण्यासंबंधी आदेश दिले आहेत.
हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी; ‘या’ नेत्याचं खुलं आवाहन
दरम्यान कीटकनाशकांच्या व्यापारासाठी परवाना असलेल्या कंपन्या आता सर्व प्रकारची कीटकनाशके ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे थेट शेतकऱ्यांना विकू शकणार आहेत. यामुळे आवश्यक ती कीटकनाशके शेतकऱ्यांना थेट शेताच्या बांधावर मिळणार आहेत. यासाठी परवानाधारक कंपन्यांची वैधता ठरवण्याची जबाबदारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची असणार आहे. यामध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्ट चा देखील समावेश आहे.
या महत्त्वाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची व पैशाची बचत होणार आहे. याआधी कीटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांना एजंट किंवा दुकानदाराला जास्तीचे पैसे द्यावे लागत होते. तसेच कीटकनाशके वेळेवर उपलब्ध होण्यासाठी वेळ लागत होता. आता मात्र त्यांच्या या समस्या सुटणार आहेत.
एखाद्या महिलेकडे टक लावून पाहताय तर सावधान; 14 सेकंदापेक्षा जास्त वेळ झाल्यास होऊ शकते शिक्षा