Crime news । पणजी : हल्ली गुन्ह्यांचे (Crime) प्रमाण खूप वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे प्रशासनापुढे एक मोठे आव्हान बनले आहे. सध्या असेच एक धक्कादायक घटना घडल्याची समोर आली आहे. एका CEO असणाऱ्या महिलेने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलाचा अतिशय निर्दयपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)
बेंगळुरू (Bangalore) येथील एका टेक कंपनीच्या सीईओ महिलेने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलाचा सिकेरी, कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये खून केला. त्याचा मृतदेह बॅगेत भरुन ती चालली असता तिला चित्रदुर्ग येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर महिला राहत असणाऱ्या रुममध्ये रक्ताचे डाग रुमबॉयला सापडले होते. त्याने तातडीने हॉटेलमधील वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यांनी याची पोलिसांना माहिती दिली. (Goa Crime)
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक चौकशी करून टॅक्सी चालकाला संपर्क करून महिलेशी संपर्क साधला. या महिलेला मुलाबद्दल विचारले असता तिची उत्तरं पोलिसांनी संशयास्पद वाटली. त्यामुळे पोलिसांनी चालकाला टॅक्सी जवळच्या पोलीस स्थानकात नेण्यास सांगितली. तिथे तिची झडती घेतली असता मुलाचा मृतदेह बॅगेत सापडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Sunil Kedar । आताच्या घडीची मोठी बातमी! काँग्रेस नेते सुनील केदार यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा