Dolly Chaiwala । सध्या सोशल मीडियावर (Social media) डॉली चायवाल्याची खूप चर्चा सुरु आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स नुकतेच त्याच्या टपरीवर चहा प्यायले. पण ज्यावेळी बिल गेट्स त्याच्या टपरीजवळ आले त्यावेळी त्याला त्यांच्याबद्दल माहिती नव्हते. नुकताच बिल गेट्स (Bill Gates) यांनी डॉली चायवाल्यासोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. (Latest marathi news)
Amravati News । बच्चू कडू समर्थक-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, नेमकं कारण आलं समोर
त्यावरून आता त्याच्या संपत्तीबाबत (Chaiwala Dolly wealth) चर्चा सुरु झाली आहे. डॉलीचे खरे नाव सुनील पाटील (Sunil Patil) असून तो नागपूरचाच रहिवासी आहे. चमकदार शर्ट, आकर्षक चष्मा आणि रंगीबेरंगी शैलीमुळे डॉली चायवाला सर्वांना खूप वेगळा वाटतो. तो मागील 16 वर्षांपासून नागपुरमध्ये चहाचा स्टॉल लावत असून अनेक सेलिब्रिटी त्याच्या चहाचे चाहते आहेत.
Loksabha Election 2024 । ब्रेकिंग! महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागा लढवणार?
त्याच्या टपरीवर असे अनेक सेलिब्रिटी चहा पितात. संपत्तीचा विचार केला तर डॉली हा 10 लाख रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. तो रोज सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत चहाची विक्री करतो. दिवसाला त्याच्या 350 ते 500 चहाची विक्री होते. त्याच्या एका कप चहाची किंमत 7 रुपयांपासून सुरू होते. इतकेच नाही तर त्याचे इंस्टाग्रामवर 11 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
Crime News । धक्कादायक! उद्धव ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाचा दगडाने ठेचून निर्घृण खून