ऊस वाहतूकदारांसाठी चक्काजाम आंदोलन होणार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची घोषणा

Chakkajam agitation for sugarcane transporters; Announcement of Swabhimani Farmers Association

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या 22 फेब्रुवारीला हे आंदोलन होणार असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत घोषणा केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यादिवशी बारावीची परीक्षा असल्याने दुपारी 12 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग बंद केला जाणार नाही.

अबब! गायीने दिला चक्क चार वासरांना जन्म; वाचा सविस्तर बातमी

ऊस तोडणी मुकादमांकडून ऊस वाहतूकदारांची होणारी फसवणूक, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे थकित अनुदान यांसारख्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देणे, सदोष वीज बिल दुरुस्त करुन देणे, वीज नियामक मंडळाची प्रस्तावित 37 टक्के वीज वाढ रद्द करणे या मागण्यादेखील करण्यात येणार आहेत. (Swabhimani Shetkari Sanghtna Announced strike)

महिलेच्या चतुरपणाला सलाम! सेल्फी घ्यायची म्हणत अभिनेत्याजवळ आली अन् केला किस करण्याचा प्रयत्न; पाहा VIDEO

यावर बोलताना राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले आहेत की, राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन होणार नसून फक्त तालुक्याच्या पातळीवरील राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्ग रोखून धरले जातील. दिवसेंदिवस ऊस तोडणी वाहतूकदरांचा प्रश्न गंभीर होत आहे. ऊस उत्पादन आणि साखर कारखान्यांची गाळप क्षमताही वाढली आहे, मात्र तोडणी मजुरांची संख्या कमी होत चालली आहे. याचाच फायदा घेऊन ऊस तोडणी मुकादमांकडून वाहतूकदारांची मोठी फसवणूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ‘स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेची’ स्थापना केली जाणार आहे.

पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार अखेर बोललेच; म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *