मुंबई : राज्यात आठवडाभर झाला पाऊस जोरदार पडत आहे. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
Sairat: सैराट फेम प्रिन्सला अटक होण्याची शक्यता; जाणून घ्या नेमकं प्रकरण?
येणाऱ्या दोन तीन दिवसात कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. त्याचबरोबर आज सकाळपासून पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः घाट माथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुणे शहर आणि परिसरात देखील रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू झाला आहे.
राजगिरा भाजीच सेवन करताय? ‘हे’ आहेत महत्वाचे फायदे
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागातही पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढच्या तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती देखील हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.