Site icon e लोकहित | Marathi News

यंदाही राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता; रोगराई वाढणार! भेंडवळच्या ‘घटमांडणी’ चा अंदाज

Chance of heavy rains in the state this year too; Disease will increase! Estimation of the 'Constitution' of Bhendval

ग्रामीण भागातील काही परंपरा थक्क करणाऱ्या असतात. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील ‘घटमांडणी’ ( Ghatmandani) देखील अशीच परंपरा आहे. ही परंपरा ३५० वर्षे जुनी असून दरवर्षी अक्षय तृतीयेला ही परंपरा जोपासली जाते. भेंडवळच्या घटमांडणी मध्ये भविष्यवाणी केली जाते. यामध्ये वर्षभराचा हंगाम, पीक, पाऊस, अर्थव्यवस्था, संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडींचे भाकीत केले जाते. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले असते.

शरद पवारांचा भाजपला इशारा! म्हणाले,”भाजपने कोणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर…”

या घटमांडणीत वर्तवण्यात आलेल्या अंदाजावरून राज्यातील शेतकरी आपल्या वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात. यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले असते. दरम्यान आजच्या घटमांडणीमध्ये वर्षभराच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

“माझ्या मुलाला आमदार करा, तो फक्त १ रुपयात…”, शेतकरी आईचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

पावसाचा अंदाज खालीलप्रमाणे :

जून – पाऊस कमी असल्याने पेरणी उशिरा होईल.
जुलै – सर्वसाधासरण पाऊस असेल
ऑगस्ट – अतिवृष्टी होण्याची शक्यता
सप्टेंबर – अवकाळी पावसात पिकांचे नुकसान होईल.

अजितदादांना वगळले अन् राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांना दिली संधी; शरद पवारांचा अजित पवार यांना दणका

याशिवाय आंबाशी कुलदैवत असल्याने यंदाच्या वर्षी रोगराई राहणार आहे. कपाशी, ज्वारी, तूर, मूग, मटकी, साळी, जवस, गहू सर्वसाधारण असेल. परंतु, साळी- तांदळाचे चांगले पिक येईल. एवढंच नाही तर हरभरा – अनिश्चित पण कमी जास्त पिक येईल. असे घटमांडणी मध्ये सांगण्यात आले आहे.

अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Spread the love
Exit mobile version