मागच्या पाच सहा दिवसापूर्वी राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी गारा देखील पडल्या आहेत. राज्यातील तापमानात (Tempreture) सातत्यानं चढ उतार होत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार 13 ते 15 मार्चदरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवांनी त्यांच्या पिकाची काळजी घ्यावी असं आव्हान कृषी विभागानं केलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुणे जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंदूरबार आणि धुळे या जिल्ह्यात 13 ते 15 मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील. तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
कोरोनानंतर फ्लू आजाराने माजवलाय हाहाकार; ‘या’ ठिकाणी लॉकडाऊनची तयारी
पुणेकरांची उष्णतेने सुटका होणार आहे. पुण्यामध्ये 13 ते 15 मार्च दरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांची उष्णतेपासून सुटका होणार आहे.
अबब! ‘या’ कोंबडीच एक अंड विकलं जातंय १०० रुपयाला; जाणून घ्या याबद्दल माहिती