सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ स्वरूपाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस देखील पडला आहे. यामध्ये हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.
‘या’ गावामध्ये होळीच्या दिवशी दगड फेकून मारले जातात; जाणून घ्या अनोख्या गावाबद्दल माहिती
अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पालघर, धुळे, नंदुरबार, पूर्व विदर्भ, मराठवाडा, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्येदेखील ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान काल रात्रीच पुण्याच्या काही भागामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात ८ मार्चपर्यंत पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर ७ मार्चला गारपिट होण्याची देखील शक्यता आहे.
चिमुकल्यांनी उडवली शिंदे गटाची खिल्ली; म्हणाले, “आले रे आले गद्दार आले, ५० खोके एकदम ओके”
अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत –
सध्या शेतकऱ्यांना कांदा रडवताना दिसत आहे. यामध्येच आता अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी राजा दुहेरी संकटात सापडला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतात कांदा काढून ठेवलेला देखील भिजला आहे. आधीच कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे आणि आता अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.