सध्या उन्हाळा ऋतू चालू आहे. मात्र तरीदेखील मागच्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Chance of rain with lightning over Madhya Maharashtra, Marathwada and Vidarbha along with Konkan)
मोठी बातमी! अण्णा हजारेंना तरुणाकडून जीवे मारण्याची धमकी
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज (१३ एप्रिल) राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १३ ते १५ एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठं संकट निर्माण झालं आहे.
अजित पवार खरंच भाजपमध्ये जाणार का? संजय राऊत म्हणाले, “शेवटी प्रत्येकजण वैयक्तिक मतं…”
अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतपिकाला भाव नाही आणि दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.