सध्या राज्यात कडाक्याची थंडी सुरू आहेत. यामुळे लोक चांगलेच गारठून जातायत. दरम्यान, राज्यात लवकरच पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात 15 डिसेंबर पर्यंत कधीही पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पाऊसाला (Heavy rainfall) सामोरे जावे लागणार आहे. यामुळे शेतकरी (Farmers) चांगलेच चिंतेत आहेत.
शाईफेक प्रकरणावर राजू शेट्टी यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
येत्या 15 डिसेंबर पर्यंत पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या अंदाजानुसार राज्यात पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे सातारा आणि कोल्हापूर ( Satara & Kolhapur) येथे पुढील तीन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बिग ब्रेकिंग! शाईफेक प्रकरणात ताब्यात घेतलेल्या पत्रकाराची सुटका
याशिवाय विदर्भातील पूर्व भागात देखील आज आणि उद्या पाऊस पडेल. असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे उद्या विदर्भामध्ये होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित सभेत सुद्धा पाऊस हजेरी लावणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. असे हवामान खात्याने सांगितले आहे.
वातावरणात झालेल्या बदलामुळे हवामान खात्याकडून काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
1) मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये.
2) रायगड किनाऱ्यावरील गावांनी सतर्क रहावे.
3) मंदौस वादळामुळे समुद्र खवळेला असणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांनी काळजी घ्यावी.
4) शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची व फळबागांची काळजी घ्यावी.
हा तर नवीनच नखरा! साडी घालून उर्फी जावेद पोहचली विमानतळावर; पाहा VIDEO