मागच्या काही दिवसापूर्वी पुण्यातील पोटनिवडणुका झाल्या आहेत. उमेदवारांची नावे जाहीर होण्यापासून ते निवडणुकीच्या निकलापर्यंत या निवडणुका चांगल्याच चर्चेत होत्या. दरम्यान भाजपचा बालकिल्ला समजला जाणाऱ्या कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. यानंतर भाजपला चांगलाच धक्का बसला.
राहुल गांधी यांना अजून एक मोठा धक्का; खासदारकीनंतर आता शासकीय बंगलाही…
मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक लागली होती, मात्र भाजपने टिळक कुटुंबातल्या कुणालाही उमेदवारी दिली नाही. आता ही उमेदवारी का दिली नाही याबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राज्याभर ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
चंद्रकांत पाटील म्हणाले, मुक्ता टिळक या आजारी होत्या त्यानंतर त्यांचे निधन झाले. यावेळी त्यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता, त्यामुळेच कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाबाहेर भाजपने उमेदवारी दिली असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यानंतर आता त्यांच्या वक्तव्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
राज्याभर ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा