चंद्रकांत पाटलांनी शाईफेकीचा धसका घेतला? सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना केला फेसशिल्डचा वापर!

Chandrakant Patal took the plunge of Shaifeki? Face shield used while participating in public events!

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील समाजसुधारकांवर चुकीचे वक्तव्य केले होते. यामुळे पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात त्यांच्यावर शाईफेक देखील करण्यात आली होती. या शाईफेक प्रकरणानंतर चंद्रकांत पाटील यांनी अतिशय सावध भूमिका घेतल्याचे पहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा शाईफेकीची धमकी आल्याने पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात सहभागी होताना त्यांनी चक्क फेस शिल्ड ( Face Shield) चा वापर केला.

धक्कादायक! बारामती मध्ये कोयते आणि तलवार वापरून राडा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी चिंचवडमधील पवनाथडी जत्रेसाठी चंद्रकांत पाटील काल ( दि. 17) उपस्थित होते. मात्र सकाळीच त्यांना सोशल मीडियावरून शाईफेकीची धमकी देण्यात आली होती. यामुळे योग्य ती खबरदारी घेत चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) पवनाथडी यात्रेत सहभागी होताना फेस शिल्डचा वापर केला. यामुळे चंद्रकांत पाटलांनी शाईफेकीची धसका घेतला की काय ? अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

“…अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल”; महाविकास आघाडीच्या महामोर्चात शरद पवार कडाडले

पुण्यातील पवनाथडी जत्रा ही विशेष प्रसिद्ध आहे. अनेक लहान मोठे उद्योग एकत्र येत ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचं पुणेकरांना दर्शन घडवतात. या जत्रेचे उद्घाटन करण्यासाठी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. मात्र दोन व्यक्तींनी सकाळी फेसबुक पोस्ट करत त्यांना शाईफेकीची धमकी दिली. “आज पुन्हा शाईची ( Ink) मुक्त उधळण होणार? मुक्काम पोस्ट सांगवी.’ पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या. पवना थडी जत्रा, ” असे या पोस्ट मध्ये लिहिण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांघवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त होता.

महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार? संजय राऊतांच मोठं विधान

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *