
Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी महायुतीत सामील होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. इतकेच नाही तर त्यांच्याकडे अर्थखाते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद (Pune Guardian Minister) देखील आहे. अशातच आता पुण्यात अजित पवार गट विरुद्ध भाजप- शिंदे गट (Ajit Pawar faction vs BJP-Shinde faction) असा संघर्ष तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कार्यकर्त्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. (Latest Marathi News)
Sharad Pawar । बच्चू कडूंना महाविकास आघाडीत परत घेणार? शरद पवार स्पष्टच बोलले….
यामुळे पुन्हा एकदा महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)च्या निधीवाटपावरून भाजप-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावरून चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे पदाधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची बैठक घेतली. यावेळी सदस्यांनी निधी वाटपात आपल्याला सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार केली. (Ajit Pawar vs Chandrakant Patil)
Pune Koyata Gang । धक्कादायक! पुण्यात कोयता गँगची दहशत थांबेना, पोलिसांसमोरच केला हल्ला
चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीला आपण अजित पवार यांच्याशी चर्चा करू. अशी भूमिका घेतली. परंतु त्यानंतर निधी न मिळाला नाही तर कोर्टात जाण्याची तयारी ठेवा, अशा थेट सूचना चंद्रकांत पाटील यांनी सदस्यांना केल्या आहेत. एकंदरीतच चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्याविरोधात संघर्षाची भूमिका घेतलेली दिसते.
Petrol Diesel Rate । कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण, पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या