
मुंबई : आपल्या महाराष्ट्राची खरी संस्कृती ही आहे की जरी राजकीय मतभेद किती टोकाला गेले तरी सार्वजनिक कार्यक्रमात हेच नेते समोरासमोर आले तर एकमेकांबद्दल आदरयुक्त भावना असते. असाच एक प्रसंग पुण्यात (pune)गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीत घडला आहे.पुण्यातील कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीत भाजपाचे (Chandrakant Patil) चंद्रकांत पाटील आणि (Aaditya Thackeray) शिवसेनेचे आ.आदित्य ठाकरे तिथे पोहचले. यावेळी एकमेकांना पाठ न दाखवता त्या दोघांनी मात्र, गणपतीची पालखी खांद्यावर घेतली.आता दोघेच सोबतच समोरासमोर आले त्यामुळे आता काय होणार असा काही पडला होता.
पण या दोघांनी सर्व मतभेद हे बाजूला ठेवले जातात याचेच दर्शन त्या दोघांनी घडवून आणले. आदित्य ठाकरे यांनी मुंबईनंतर पुणे येथील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी दिल्या. तसेच तयांनी दगडुशेठ हलवाई, कसबा गणपती या ठिकाणी भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मंडळाच्या मिरवणूकीत सहभाग घेताच तरुणांचा उत्साह शिगेला पोहचला जात होता.तसेच तरुण-तरुणींनी आदित्य ठाकरेंशी सेल्फी घेण्यासाठी गराडा घातला होता.
Anushka Sharma: अफगाणिस्तानविरुद्ध विराटची शतकी खेळी, पत्नी अनुष्काने केली भावूक पोस्ट; म्हणाली…
5 हजार पोलिसांचा बंदोबस्त
पुण्यात 3 हजार सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. यावेळी शहरात सर्वत्र शांततेत मिरवणूका आणि विसर्जन होण्याच्या दृष्टीने 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले आहे.