Chandrakant Patil । सध्या कंत्राटी भरतीवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कंत्राटी भरती वरून विरोधी पक्षांकडून सत्याधाऱ्यांवर जोरदार टीका देखील केली जात आहे. याच दरम्यान कंत्राटी भरतीच्या विरोधात भीमआर्मी देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ सोलापूर मधील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना काळा झेंडा दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Solapur Political News)
या प्रकारानंतर तातडीने पोलिसांनी या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वीच सोलापूरच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ते काल सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.
Jugad Video । भन्नाट जुगाड! तरुणाने बनवली पाण्यावर चालणारी बाईक; व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
ज्यावेळी चंद्रकांत पाटील कारमधून उतरले त्यावेळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने त्यांना काळा झेंडा दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्यांनी खाजगीकरण रद्द करा अशा घोषणा देखील दिल्या. त्याचबरोबर शाई फेकण्याचा देखील त्याने प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला तातडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.