
पुण्यामध्ये चिंचवड व कसबा विधानसभा पोटनिवडणूक (Chinchwad – Kasba Assembly Elections) अगदी तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे.
बिग ब्रेकिंग! कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उतरणार मैदानात
सर्व पक्षांचा प्रचार देखील जोरात चालू आहे. देवेंद्र फडणवीस कसब्यावर लक्ष ठेवून आहे. त्याचबरोबर पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील आता प्रचारात उतरले आहेत. दरम्यान, आज एक सभा झाली यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
सहलीसाठी गेले अन् जेवणातून ८२ विद्यार्थ्यांना विषबाधा; विद्यार्थी रूग्णालयामध्ये दाखल
चंद्रकांत पाटील म्हणाले, शेवटच्या दोन दिवसांमध्ये धंगेकर महात्मा गांधींना स्वर्गातून प्रचारासाठी घेऊन येतील. असे वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यांनंतर नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्याच्या या विधानावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.
बातमी कामाची! शेतकऱ्यांनो ‘या’ पद्धतीने ओळखा खतातील बनावटपणा; वाचा सविस्तर