Chandrasekhar Bawankule । चंद्रशेखर बावनकुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य; म्हणाले, “संविधान बदलणार…”

Chandrasekhar Bawankule

Chandrasekhar Bawankule । पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत, ही अतिशय दुर्दैव बाब आहे. असं ट्विट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांसह विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Topers Ad

Maharashtra Politics । धक्कादायक बातमी! शिंदे गटाच्या ५ विद्यमान खासदारांची उमेदवारी धोक्यात?

भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत आहे. शरद पवार ज्या काँग्रेस मध्ये एकेकाळी होते तो काँग्रेस पक्ष सत्तेत असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली संविधान कितीदा बदलविण्यात आले, याचा आकडा पवार साहेबांकडे नक्कीच असणार. उलट मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील दहा वर्षात संविधानाचा सन्मानच केला आहे. पंतप्रधान मोदीजींनी संसद भवनाला संविधान सदन असं नाव दिलं आहे. भाजपने नेहमीच घटनात्मक मूल्य आणि राष्ट्रहितासाठी काम केलं आहे. त्यामुळे जनतेनं कुठल्याही नेत्यांच्या भुलथापांना बळी पडू नये. पवार साहेबांच्या तर अजिबातच नाही. अशी टीका ट्विट करत बावनकुळे यांनी केली आहे.

Shahaji Bapu Patil । ब्रेकिंग! आमदार शहाजी बापू पाटील यांना सर्वात मोठा धक्का!

काय म्हणाले होते शरद पवार?

इंदापूर या ठिकाणी काल महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शरद पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली. “कर्नाटकमध्ये एका मंत्र्याने संविधान बदलण्यासाठी मतदान द्या, असे विधान केले, याची आठवण काल शरद पवारांनी करून दिली होती. त्यांच्या त्याच वक्तव्यावरून बावनकुळे यांनी ट्विट करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Maharashtra Lok Sabha । “… तर निवडणुका बॅलेट पेपरवर होणार”, निवडणूक आयोगाने दिली महत्त्वाची माहिती

Spread the love