Chandrayaan-3 Latest Update | चांद्रभूमीवर पोहोचलेल्या लँडर, रोव्हरचं काय? ISRO ने दिली महत्वाची माहिती

Chandrayaan-3 Latest Update

Chandrayaan-3 Latest Update | भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे चांद्रयान-3 मिशन यशस्वी ठरल असून चंद्रभूमीवर बुधवारी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी भारताचा तिरंगा फडकला. यानंतर भारतीयांमध्ये मोठा आनंदाचा उत्सव पाहायला मिळाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. इतर देशांना जे जमलं नाही ते भारताने करून दाखवला आहे. त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांचे सगळीकडे कौतुक होत आहे. (Chandrayaan-3 Latest Update )

Baramti News । मोठी बातमी! बारामती कचरा डेपोला भीषण आग; 80 लाख रुपयांचे नुकसान

तमाम भारतीयांना त्यांनी अभिमानाचा क्षण अनुभवण्याची संधी दिली. आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रभूमीवर आहेत. चांद्रयान-3बद्दल अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. प्रश्न निर्माण होणे सहाजिकच आहे. यशस्वी सॉफ्ट लँडिंगनंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काय करतायत? त्यांची स्थिती कशी आहे? याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतात मात्र आता स्वत: इस्रोनेच या बद्दल टि्वट करुन माहिती दिली आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का बसणार? तीन आमदार देणार सोडचिट्ठी?

इस्रोने ट्विट करत याबाबत लिहिले आहे की, “मेड इन इंडिया, मेड फॉर द मून Chandrayaan-3 चा रोव्हर लँडरमधून बाहेर आलाय. भारताने चंद्रावर मून वॉक सुरु केलाय. लवकरच पुढचे अपडेट्स मिळतील” असं ट्विट इस्रोने केले आहे.

Crop Update । शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! पाण्याअभावी पीके धोक्यात

Spread the love